Manisha Mhaiskar :IAS महिला अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट! महायुती सरकाऱ्याच्या मंत्र्यावर गंभीर आरोप, 2023 मध्ये काय घडलं होतं?
Manisha Mhaiskar : राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे प्रशासकीयसह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Manisha Mhaiskar : महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी एका धक्कादायक अनुभवाचा खुलासा करत, एका मंत्र्याने “मला माझ्या खात्यासाठी महिला सचिव नको” असे म्हणत त्यांना नाकारल्याचा गौप्यस्फोट केला आहे. Manisha Mhaiskar
हा अनुभव त्यांनी आपल्या 33 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत प्रथमच आल्याचे सांगितले आहे. दिल्ली येथे झालेल्या महिला अधिकाऱ्यांच्या संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी हा कटू प्रसंग मांडला आहे. Manisha Mhaiskar
नेमक काय घडलं? Manisha Mhaiskar

Manisha Mhaiskar :IAS महिला अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट! महायुती सरकाऱ्याच्या मंत्र्यावर गंभीर आरोप, 2023 मध्ये काय घडलं होतं?
म्हैसकर यांच्या म्हणण्यानुसार, 2023 मध्ये राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी एका मंत्र्याने त्यांच्या कामाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत केवळ त्या महिला असल्यामुळे आपल्या विभागात घेण्यास नकार दिला.
‘स्त्री’ असल्यामुळे नकार
तीन दशकांहून अधिक काळ विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतरही केवळ लिंगाच्या आधारावर असा अनुभव आल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. त्यांच्या मते, हा प्रकार प्रशासनातील पुरुषी मानसिकतेचे उदाहरण आहे. Manisha Mhaiskar
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
म्हैसकर यांनी संबंधित मंत्र्याचे नाव उघड केलेले नाही. मात्र, “2023 मधील सरकार” असा उल्लेख केल्यामुळे हा आरोप सध्याच्या सत्ताधारी गटातील एका वरिष्ठ मंत्र्यावर असल्याची चर्चा रंगली आहे.
या खुलाशानंतर मंत्रालयात आणि राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, संबंधित मंत्री नेमका कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तसेच प्रशासनातील पुरुष-महिला भेदभावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. Manisha Mhaiskar
हेही वाचा : Dacoit Box Office : डकैतने पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; पाहा बॅाक्स अॅाफिस कलेक्शन





