Neha Kakkar | बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे परफॉर्म करण्यासाठी तब्बल 3 तास उशिरा पोहचली होती. त्यामुळे भडकलेल्या चाहत्यांनी तिला परत जाण्यास सांगितले आणि ती रडली देखील होती. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता ऑस्ट्रेलियामध्ये ज्या कंपनीने नेहाचा कॉन्सर्ट आयोजित केला होता. त्यांनी मोठा खुलासा केला आहे. नेहाने ७०० लोकांसाठी परफॉर्म करण्यास नकार दिला. त्यामुळे तिला कॉन्सर्टमध्ये पोहोचण्यास उशीर झाला. तसेच तिला मानधन न दिल्याबद्दल ती खोटे बोलली आहे, असा दावा आयोजकांनी केला आहे. नेहा कक्करने खुलासा केला होता की तिला मेलबर्नमधील तिच्या कॉन्सर्टसाठी पैसे दिले गेले नव्हते. आयोजकांनी टीमला हॉटेल, जेवण किंवा पाणी दिले नव्हते. तिने सर्व व्यवस्था स्वतः केली, ज्यामुळे ती कॉन्सर्टला ३ तास उशिरा पोहोचली. याबद्दल पेस डी आणि बिक्रम सिंग रंधावा यांनी सिद्धार्थ कन्ननशी बोलताना पैसे न मिळाल्याच्या दाव्याचे खंडन केले आणि म्हटले की, ‘जर हॉटेल नसते तर ती कुठे राहत होती? ती जी वॅगनमधून प्रवास करत होती त्याच काय? ऑस्ट्रेलियामध्ये कलाकारांना देशात जाण्यापूर्वी पूर्ण पैसे दिले जाणे सामान्य आहे. नेहा कक्करने एकाच कंपनीसोबत सलग दोन दिवसांत दोन शो केले. तिचा पहिला शो सिडनीमध्ये होता, ज्यामध्ये १५००-२००० लोक उपस्थित होते आणि तो चांगला पार पडला.’ पुढे ते म्हणाले की, ‘दुसऱ्या दिवशी मेलबर्नमध्ये दुसरा शो आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला फक्त ७०० लोक उपस्थित होते आणि म्हणूनच ती कार्यक्रमासाठी तीन तास उशिरा पोहोचली. तिथे आलेले लोक तिच्यावर खूप रागावले होते कारण ते खूप वाट पाहत होते. लोकांनी 300 AUD (16,000 रुपये) दिले होते. नेहा कक्करने प्रेक्षकांची संख्या लक्षात घेऊन परफॉर्मन्स करण्यास नकार दिला आणि आयोजकांनी कार्यक्रमाचे ठिकाण गर्दीने भरेपर्यंत ती स्टेजवर येणार नाही असे सांगितले.’ दरम्यान, मेलबर्नमधील कार्यक्रमासाठी गर्दी न आल्यामुळे आयोजकांना ५००,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. Neha Kakkar | हेही वाचा: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा कोर्टात युक्तिवाद; न्यायालयाने घेतला मोठा निर्णय