Lalita Tarakh : तुम्ही कसे उपोषण केले, हे वेळ आल्यावर सांगेन! जरांगेंना थेट इशारा; ‘या’ गंभीर आरोपामुळे खळबळ
Lalita Tarakh : "तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार तुम्ही कसे उपोषण केलं हे मी वेळ आल्यावर सांगेन." असा थेट इशारा त्यांनी मनोज जरांगेंना दिला आहे.

Lalita Tarakh makes serious allegations against Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचदरम्यान मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या एका महिला सहकारीने मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
“जरांगे यांनी आमच्या गावाला खोटं आश्वासन देऊन माता माऊल्यांना फसवलं. भावनिक करून महिलांचा वापर केला.” असा गंभीर आरोप मराठा आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनी केला आहे. “तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार तुम्ही कसे उपोषण केलं हे मी वेळ आल्यावर सांगेन.” असा थेट इशारा त्यांनी मनोज जरांगेंना दिला आहे. (Lalita Tarakh)
ललिता तारख म्हणाल्या, मनोज जरांगे यांचे चौथे उपोषण सोडवण्यात आपण सहभागी होतो. आंदोलनाच्या काळात रात्रंदिवस काम केल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच अंतरवाली सराटी येथून एकही कुणबी प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे त्यांनी म्हटले.
हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्रासाठी दहा महिन्यांपूर्वी अर्ज केल्याचेही त्यांनी सांगितले. या आरोपांमुळे मराठा आंदोलनातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. ललिता तारख यांच्या आरोपांवर मनोज जरांगे काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख केंद्र राहिलेल्या अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळावरील मंडप हटवण्यात आला आहे. (Lalita Tarakh)

Lalita Tarakh : तुम्ही कसे उपोषण केले, हे वेळ आल्यावर सांगेन! जरांगेंना थेट इशारा; ‘या’ गंभीर आरोपामुळे खळबळ
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथील हे आपले शेवटचे आंदोलन असल्याचे म्हटले होते. सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याचे जरांगे यांनी सांगितले. या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्याहून मुंबईच्या दिशेने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
त्यामुळे ललिता तारख यांनी केलेले आरोप, अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळ हटवणे आणि सरकारला देण्यात आलेली तीन महिन्यांची मुदत या पार्श्वभूमीवर पुढील घडामोडींकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Shivsena UBT : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठी घोषणा





