नवाब मलिकांची भूमिका ऐकल्यावरच ‘मी’ माझी भूमिका मांडेन – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले असून विधानसभा सभागृहात ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर आता अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अजित पवार म्हणाले,’नवाब मलिकांची भूमिका काय आहे, त्यांचं मत काय आहे, हे ऐकल्यावरचं मी माझं मत मांडेन, कोणी कुठे बसायचं हे सांगण माझा अधिकार नाही.’ असेही पवार म्हणाले आहे.
दरम्यान, राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्या दरम्यान, अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडण्यासाठी वेगेवेगळे मुद्दे समोर आणले जात आहे. त्यातच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसल्याने त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला असल्याचे सर्वाना स्पष्ट झाले. त्यानंतर देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक तुमच्यासह कसे? असा आरोप विरोधकांकडून करण्यात येऊ लागल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. याच पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरद पवार) खासदार यांनी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रावर सुप्रिया सुळे यांनी, “भाजपने नवाब मलिक यांच्यावर जे आरोप केले ते चुकीचे आहेत. नवाब मलिक यांनी ड्रग्ज माफियांविरुद्ध नेहमीच लढा दिला. भाजप ‘भ्रष्ट ‘जुमला पार्टी’ बनली आहे. नवाब मलिक त्याचा पर्दाफाश करत राहिले… एखादी व्यक्ती दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष असते मग भाजप खोटे आरोप कसे करू शकते? मला पूर्ण विश्वास आहे की न्यायालय न्याय करेल आणि नवाब मलिकला न्याय मिळेल. आम्ही त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत. ” असे म्हणत आपण नवाब मालिकांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.





