“…म्हणून माझ्या मुलांना मी भारतीय शाळेत पाठवले नाही”; सुनील शेट्टींनी सांगितलं यामागचं कारण

मुंबई – अभिनेता सुनील शेट्टीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेकदा ते स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आले आहेत. सुनील शेट्टी यांची दोन्ही मुलं परदेशी शाळेत शिकली आहेत. त्यांनी त्यांच्या मुलांना भारतीय शाळेत शिक्षण घेऊ दिले नाही, याचे कारण त्यांनी सांगितले आहे. सुनील शेट्टी यांचा हा निर्णय कदाचित अनेकांना न रुचणारा आहे. मात्र यामागची त्यांची भावना त्यांनी स्पष्ट केली आहे.
सुनील शेट्टी यांच्या मुलीच नाव अथिया शेट्टी आणि मुलाचं नाव अहान शेट्टी आहे. त्यांची ही दोन्ही मुलं अमेरिकन बोर्डाच्या शाळेत शिकली आहेत. याबाबत सुनील शेट्टी यांनी सांगितले की, “मी आधीच ठरवलं होतं की माझ्या मुलांना मी भारतीय शाळेत घालणार नाही. ज्या शाळेचं नेतृत्व अमेरिकन बोर्ड करत असेल अशा शाळेमध्ये मी माझ्या मुलांना पाठवेन. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना कोणीही विशेष वागणूक देऊ नये अशी माझी इच्छा होती. मला त्यांना अशा जगात पाठवायचं होतं ज्यात ते कोण आहेत याचा कोणालाही फरक पडणार नाही. मी हा निर्णय घेतल्यावर मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की यात भरपूर खर्च येईल. पण मी त्यांना तयार केलं.”
दरम्यान, अथियाचे वडिलांप्रमाणे मनोरंजन क्षेत्रात येण्याचे स्वप्न होते. त्यामुळे तिने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी प्रवेश घेतला. त्यानंतर तिने ‘हिरो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नुकतेच मुलगी अथियाचं भारतीय क्रिकेटपटू के एल राहुलसोबत थाटामाटात लग्न झाले. तर अहान शेट्टीने देखील अभिनेता म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला. ‘तडप’ या चित्रपटातून अहानने सिनेसृष्टीत एंट्री केली. सुनील शेट्टी यांच्या मुलांनी स्वत: च्या इच्छेने या क्षेत्रात काम करण्याचे ठरवले.





