मी माझ्या प्रभागात मशिदींसमोर भोंगे लावणार नाही; वसंत मोरेंच्या भूमिकेने ‘मनसे’त खळबळ

Updated On:

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून अजानला विरोध केला जाईल, असा इशारा दिला होता. तसं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं. मात्र त्यांच्या या भूमिकेला पक्षातूनच विरोध होत असून पक्षातील इतर नेत्यांमध्ये यावरून मतभेद निर्माण झाले आहेत.

पुण्यातील मुस्लीमबहुल भागांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या मनसेच्या नेत्यांमध्ये राज यांच्या भूमिकेविषयी नाराजी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाता मतितार्थच समजलेला नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.

वसंत मोरे यांनी म्हटलं की, राज ठाकरे यांच्या नव्या आदेशामुळे आपण संभ्रमात आहोत. माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत होईल. तसेच मी माझ्या प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार. कोणीही वेगळा प्रयत्न करणार नाही.

आणखी संबंधित बातम्या

Sanjay Shirsat : "पब्लिसिटीसाठी हवा करण्याचा मोर्चा"; संजय शिरसाट यांची ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर टीका

2026-10-04 21:24:47

Sanjay Shirsat : "पब्लिसिटीसाठी हवा करण्याचा मोर्चा"; संजय शिरसाट यांची ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर टीका

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

2026-10-04 17:06:42

Ashish Shelar : ठाकरे बंधूनी काढलेली निषेध रॅली म्हणजे कोल्ह्यांचा मोर्चा होता; मंत्री आशिष शेलार यांची टीका

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

2026-10-04 14:53:43

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

2026-10-04 13:16:25

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा

2026-10-04 08:18:00

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा