Ashok Saraf : मी मालिकेत काम करणार नव्हतो…पण; अशोक सराफ यांनी सांगितलं ‘हे’ कारण

मराठी सिनेसृष्टीत आपले योगदान देऊन सिनेरसिकांवर आपल्या अभिनयाची जादू सदैव अबाधित ठेवणारे जेष्ठ कलाकर अशोक सराफ यांची नुकतीच टीव्ही सीरियलवर पुनरागम झाले आहे. त्यांची कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘अशोक मा. मा.’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. सिनेमा आणि नाटकांमधून अशोक मामांच्या अभिनयाची झलक सगळ्यांनीच पाहली असून त्यांच्या ‘अशोक मा. मा.’ या महिन्याभरापूर्वी आलेल्या सिरियलला प्रेक्षकांचा उस्फुर्ते प्रतिसाद मिळत आहे. अशोक सराफ यांनी मालिकेत काम करण्यामागचे कारण एका मुलाखतीमध्ये दिले आहे.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याविषयी अशोक सराफ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. खरं सांगायचं तर, मी मालिका करणार नव्हतो. मालिका, डेलिसोपमध्ये काही वेगळं करता नाही. या मालिकेत काम करण्यासाठी घरातून मोठा आग्रह करण्यात आला विशेष म्हणजे निवेदिताने करा मालिका असे सांगितल्याने मी मालिका करण्यास तयार झालो असल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले. तसेच मालिका संपल्यानंतर पुन्हा एकदा नाटकाकडे वळणार असल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले.





