“माझ्यावर ४ गुंडांनी हल्ला केला”‘ संकर्षण कऱ्हाडेच्या पोस्टमुळे चाहते संभ्रमात

मुंबई – अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. उत्तम अभिनयाने त्याने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. काही कार्यक्रमांमध्ये त्याने सुत्रसंचालनही केले आहे. मात्र नुकतेच संकर्षणने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
इनस्टाग्राम अकाऊंटवर संकर्षणने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या हाताला जखम झाल्याचे दिसते. हा फोटो शेअर करत त्याने “परवा रात्री माझ्यावर ४ (चार) गुंडांनी हल्ला केला.. मी त्यांच्याशी २ (दोन) हात केले. त्यात माझा १ (एक) हात जखमी झालाय.. ह्याची तुम्हाला ० (शुन्य) कल्पना होती म्हणुन हा फोटो पोस्ट करत आहे,” असे कॅप्शन दिले आहे.
या पोस्टवर चाहते देखील त्याला काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. मात्र अभिनेत्री स्पृहा वरदने यावर “मस्त रे” अशी कमेंट केली आहे. त्यामुळे संकर्षणच्या या पोस्टवरून तो आगामी प्रोजेक्टचे प्रमोशन करत असल्याचे दिसते. परंतु या पोस्टमुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.
View this post on Instagram
सध्या संकर्षण ‘नियम व अटी’ लागू या नाटकाच्या प्रयोगासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. येथील फोटो व व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. त्याचदरम्यान त्याने शेअर केलेल्या याफोटोने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र संकर्षणने शेअर केलेला हा फोटो कोणत्या चित्रपटाशी किंवा नाटकाबाबत आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.





