“मला मुंबईच्या सर्वसामान्यांप्रमाणे जगायचे आहे…” अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. अमृता फडणवीस यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी अमृता फडणवीस यांना एक्स दर्जाची सुरक्षा होती. सुरक्षा वाढवल्यानंतर त्यांनी ट्रॅफिक क्लीयरन्स पायलट वाहन सुरक्षा स्विकारण्यास नकार दिल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटींसह व्हीआयपी लोकांच्या सुरक्षिततेमध्ये बदल करण्यात आले. ज्यात अभिनेता सलमान खानचाही समावेश होता. वाय प्लस सुरक्षा दिल्यानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात त्या म्हणतात, “मला मुंबईच्या सामान्य नागरिकांप्रमाणे जगण्याची इच्छा आहे. माझी नम्र विनंती आहे,मला ट्रॅफिक क्लीयरन्स वाहन प्रदान करू नका असे म्हणत त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग केले आहे”,

मुंबईतील रहदारी आणि ट्रॅफिकची स्थती खराब आहे असं देखील अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. तसेच मुख्यंमत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नव्या इन्फ्रा आणि प्रकल्पांमुळे सर्वसामान्यना दिलासा मिळेल असा विश्वास देखील अमृता फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे.





