अमृता फडणवीस यांनी ‘महाशिवरात्री’च्या दिल्या हटके शुभेच्छा ! शेअर केलेल्या व्हीडीओवरून नेटकरी म्हणतात,लोकांना का त्रास देता ?

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज महाशिवरात्रीच्या सर्वांना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी शिवरात्रीनिमित्त शिव ताडंव स्त्रोत्र आपल्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ज्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना भन्नाट रिप्ले दिल्याचे पाहायला मिळत आहे.
अमृता फडणवीस या उत्तम गायिका असून काही दिवसांपूर्वी त्याचे ‘आज मै मुड बणा लिया’ हे गाणं प्रदर्शित झालं होत. या गाण्याला पन्नास मिलियन हुन अधिक व्हिवज मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांनी शिव तांडव स्त्रोत्र शेअर केले आहे. एक वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांनी स्वतः हे स्त्रोत्र गायलं होत.

“नम: पार्वती पतये, हर हर महादेव ! सर्वांना ‘महाशिवरात्री’च्या पवित्र पर्वाच्या मंगलमयी शुभेच्छा.. इस पवित्र पर्व पर सुनिये शिव तांडव स्तोत्र” असं कॅप्शन देत अमृता फडणवीस यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या गाण्याला युट्युबवर तेरा मिलियन पेक्षा अधिक व्हिवज मिळालेले आहेत.
View this post on Instagram
अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक फॅन्सने हर हर महादेवच्या कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर मिश्किल टोलेबाजी केल्याचे देखील पाहायला मिळते. इरिटेटिंग व्हॉइस आहे तुमचा,व्हिडीओ बनवणं थांबवा अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर दुसऱ्याने लोकांना का त्रास देता असा सवाल विचारला आहे. तर आणखी एकाने हे गाणं स्वतः ऐकण्याचा सल्ला दिला आहे. एकूणच शेअर केलेल्या व्हीडीवरून अमृता फडणवीस यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याचे दिसून येत आहे.





