‘मैं एक बार लापता होना चाहता हूँ’; अभिषेक बच्चनच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत

Abhishek Bachchan | अभिनेता अभिषेक बच्चन सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर हिंदीमध्ये काही ओळी शेअर केल्या आहेत. ज्यात त्याने ‘मला एकदा बेपत्ता व्हायचंय’ अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावरून चाहत्यांनी त्याच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
अभिषेक बच्चनची पोस्ट-
‘मैं एक बार लापता होना चाहता हूँ, भीड में खुद को फिर से पाना चाहता हूँ| जो कुछ भी था, सब दे दिया अपनों के लिए, अब जरा सा वक्त, बस अपने लिए चाहता हूँ|’ (मला एकदा बेपत्ता व्हायचंय. लोकांच्या गर्दीत पुन्हा स्वत:लाच भेटायचं आहे. जे काही होतं, ते सर्व मी माझ्या जवळच्या माणसांना दिलं, आता फक्त थोडीसा वेळ माझ्यासाठी हवा आहे), अशी पोस्ट अभिषेकने शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘कधी कधी स्वत:ला भेटण्यासाठी सर्वांपासून ‘missing’ (बेपत्ता) व्हावं लागतं.’ Abhishek Bachchan |
View this post on Instagram
अभिषेकच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘काही दिवसांसाठी हिमाचल प्रदेशला ये, तुला खूप चांगलं वाटेल’, असं एकाने म्हटलं आहे. तर काहींनी अभिषेकला पत्नी आणि मुलीसोबत कुठेतरी फिरून येण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी त्याला सोलो ट्रिपला जाण्याचाही सल्ला दिला आहे. Abhishek Bachchan |
मात्र, काही युजर्सनी अभिषेकच्या पोस्टवरुन त्याला ट्रोलही केले आहे. ‘भाऊ, तुम्ही तर बॉलिवूडमध्येच गायब आहात, कोण ओळखतं तुम्हाला.’, ‘हो, इतक्या फ्लॉप चित्रपटांनंतर गायब होणं तर बनतंच,’ ‘तुम्ही तर आधीपासूनच बॉलिवूडमधून गायब आहात,’ अशा टीका काही नेटकऱ्यांनी केली आहे. Abhishek Bachchan |
‘हाउसफुल 5’ चित्रपटाचे कलेक्शन
दरम्यान, अभिषेक अलीकडेच रिलीज झालेल्या ‘हाउसफुल 5’ मध्ये दिसला, ज्यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, नाना पाटेकर, फरदीन खान, जॅकी श्रॉफ, रणजीत आणि जॉनी लीव्हर यांच्यासह अनेक स्टार्स होते. ‘हाउसफुल 5’ ने 12 दिवसांत देशभरात 162.25 कोटींचे, तर जागतिक स्तरावर 248.50 कोटींचा कलेक्शन केले आहे.
हेही वाचा:
बाबा भरतशेठ…; गोगावलेंकडून पुन्हा अघोरी पूजा? आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप





