Manikrao Kokate : “मी कोणाला तरी…”; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कृषीमंत्र्यांच स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

Manikrao Kokate : पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवरच रमीचा डाव मांडल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवरून सभागृहात कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता या प्रकरणी खुद्द कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी कोणाला तरी दाखवत असेल अशा प्रकारची रमीची जाहिरात येत म्हणून, अशी प्रतिक्रिया कोकाटेंनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाले?
मी कोणाला तरी दाखवत असेल अशा प्रकारची रमीची जाहिरात येते मोबाईलवर, ती किती चूकची आहे, त्याच्यामुळे किती लोकांवर परिणाम होतो असे शेजारी बसलेल्यांना सांगत असेल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मी सभागृहात एकदम सिरीयसली उत्तर देतो अन् बसतो, असेही ते म्हणाले आहेत. तर लवकरच याबद्दल खुलासा करेन असे देखील सांगितले. ही प्रतिक्रिया त्यांनी झी २४ तास या वाहिनीसोबत बोलताना दिली आहे.
राऊतांचा मोठा दावा
संजय राऊत यांनी कोकाटे यांच मंत्रिपद जाणार असल्याचा मोठा दावा केला आहे. तसेच अमित शाह यांनी राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदापासून वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केला असल्याचे देखील राऊत म्हणाले आहेत.
आव्हाड, मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. सभागृहात रमी खेळतानाच्या घटना घडू नयेत, इथिकल कमिटीने याचा खुलासा करावा, असे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे, तर शेतकऱ्यांनी विसरा हमी खेळा रमी असे एक पोस्टर शेअर करत कॅप्शनमधून कोकटे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधला आहे.
हेही वाचा : उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनला आग ; आपत्कालीन लँडिंग, भयानक व्हिडिओ समोर





