Vedika Pinto : ‘ही भूमिका मी नाकारूच शकले नसते’; वेदिका पिंटोने सांगितलं ‘मुसाफिर कॅफे’मध्ये काम करण्याचं कारण
Vedika Pinto : दरम्यान, सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर कोणत्या सेलिब्रिटींनी तिला सर्वात आधी फोन केला होता, हे अभिनेत्रीने उघड केलं.

Vedika Pinto : अभिनेत्री वेदिका पिंटो सध्या तिच्या ‘मुसाफिर कॅफे’ या रोमँटिक-ड्रामा वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. या वेबशोमध्ये तिने सुधा हे पात्र साकारलं असून, या भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक केलं जात आहे.
ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. प्रेक्षकांचं सिरीजला मिळत असलेलं प्रेम पाहून वेदिका पिंटो हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. यासोबतच तिला ही भूमिका कशी मिळाली आणि वेबसिरीज प्रदर्शित झाल्यानंतर सर्वात अगोदर कोणाचा फोन आला होता याविषयी ती सांगितलं.
वृत्तसंस्था आयएएनएससोबत संवाद साधताना आतापर्यंत कोणत्या भूमिकेला प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रेम मिळालं आहे, असं विचारल्यावर वेदिका म्हणाली “मुसाफिर कॅफेने मला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आहे. ही एक रोमँटिक कथा असल्यामुळे मला वाटतं की लोक नैसर्गिकरित्या रोमँटिक पात्रांशी जोडले जातात आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.”
दरम्यान, सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर कोणत्या सेलिब्रिटींनी तिला सर्वात आधी फोन केला होता, हे अभिनेत्रीने उघड केलं. ती म्हणाली,
“सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर मला राकेश रोशन यांचा फोन आला. माझ्यासाठी तो एक खूप मोठा क्षण होता, कारण मी लहानपणापासून त्यांची चाहती आहे. त्यामुळे सीरिज प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांचा फोन येणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे” (Vedika Pinto)
अभिनेत्रीने स्पष्ट केलं की, सुधाच्या भूमिकेने तिला इतकं मोहित केलं की ती ही भूमिका नाकारू शकली नाही. “ही भूमिका निवडण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे तिची कथा. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, मला सुधाचं पात्र आणि तिचा आत्मविश्वास खूप आवडला. या पात्रात असे अनेक गुण आहेत जे मला माझ्या आयुष्यात आणायचे आहेत. त्यामुळेच मी या भूमिकेकडे आकर्षित झाले.”
‘मुसाफिर कॅफे’ नेटफ्लिक्सवर उपलब्ध (Vedika Pinto)
‘मुसाफिर कॅफे’ नेटफ्लिक्सवर उपलब्ध
‘मुसाफिर कॅफे’ ही रोमँटिक-ड्रामा वेबसिरीज दिव्या प्रकाश दुबे यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये विक्रांत मेस्सी, वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत आहेत. २४ जुलै रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिरीज प्रदर्शित झाली आहे.
Thailand Firing : थायलंडच्या शाळेत अंदाधुंद गोळीबार ; शिक्षकासह 7 जण ठार, 20 विद्यार्थी जखमी





