“मी कधीच कल्पना केली…”; कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट चर्चेत; कोण आहे पीटर हाग?

Celina Jaitley : अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटली तिच्या खाजगी आयुष्यातील एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. तिच्या वैवाहिक जीवनातील होणारी उलथापालथ आता सगळ्यांसमोर आली आहे. मंगळवारी सेलिना जेटलीने तिचा पती पीटर हागविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटका दाखल केल्याचे वृत्त आहे. यासंबंधी आता सेलिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
मी कधीच कल्पना केली नव्हती की असा दिवस येईल.” “#धैर्य #घटस्फोट… माझ्या आयुष्यातील सर्वात तीव्र आणि अशांत वादळाच्या दरम्यान, मी कधीही कल्पना केली नव्हती की मी एकटी लढेन, आईवडिलांशिवाय. असे तिने लिहिले आहे. पुढे ती लिहिले, मी कधीही कल्पना केली नव्हती की असाही दिवस येईल जेव्हा ज्या आधारस्तंभांवर माझ्या आयुष्याचे छत होते तेच नाहीसे होईल, असे सेलिनाने सांगितले आहे.
View this post on Instagram
आयुष्याने सर्व काही हिरावले आहे, ज्यांवर मी विश्वास ठेवला होता ते सोडून गेले, ज्या वचनांवर मी विश्वास ठेवला होता ती शांतपणे मोडली गेली. पण वादळ मला बुडवू शकले नाही, त्याने मला वाचवले. त्याने मला प्राणघातक पाण्यातून आणि गरम वाळूवर खेचले. त्याने मला माझ्या आत असलेल्या स्त्रीचा सामना करण्यास भाग पाडले जी मरण्यास नकार देत आहे. असेही अभिनेत्रीने पोस्टमध्ये म्हटले आहे.
मी सैनिकाची मुलगी आहे. धैर्य, शिस्त, हिंमत, लवचिकता, जोश आणि विश्वास या आधारावर मी लहानाची मोठी झाली आहे. जेव्हा तुम्हाला जग खाली पाडतं तेव्हा उठून उभं राहायचं असंत हे मला शिकवलं गेलं आहे. जेव्हा हृदय तुटत असतं तेव्हा लढायचं असतं, अशी भावना तिने व्यक्त केली आहे. अन्याय होत असतो तेव्हा दया दाखवायची नसते. असंभव वाटणाऱ्या गोष्टीतूनही बाहेर पडायचं असतं हे मी शिकले आहे. माझ्या सैनिक भावासाठी लढणं, मुलांच्या प्रेमासाठी लढणं आणि माझ्या आत्मसम्मानासाठी लढणं ही माझी आता प्राथमिकता आहे. माझ्यावर झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराविरोधात तक्रार दाखल केली आहे, असे तिने पोस्टमधून सांगितले आहे. सेलिनाचा पती पीटर हाग हा ऑस्ट्रियन हॉटेल व्यावसायिक आणि प्रख्यात उद्योगपती आहे.
हेही वाचा : “९ किलो सोने, दागिने, भेटवस्तू अन् बरंच काही…” ; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये काय-काय सापडले?





