Annu Kapoor : “मला त्यांचे चेहरे माहिती, ना त्यांचं काम”; अन्नू कपूर यांच्या वक्तव्याने नवा वाद!
Annu Kapoor : अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याला रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रणवीर सिंग यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

Annu Kapoor : बॉलिवूडमधील ज्येष्ठ आणि बहुआयामी अभिनेते अन्नू कपूर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि रोखठोक मतांसाठी कायम चर्चेत असतात. यासोबतच त्यांनी केलेली वक्तव्य वादात सापडत असतात. आता पुन्हा एकदा त्यांचे वक्तव्य वादात सापडले आहे. (Annu Kapoor )
यापूर्वी अभिनेते अन्नू कपूर यांनी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले होते. ज्यामुळे मोठा वादा निर्माण झाला होता. वाढत्या वादानंतर अभिनेत्याने दिलगिरी व्यक्त केली होती. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याला रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रणवीर सिंग यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. (Annu Kapoor )
या प्रश्नाच्या उत्तरामुळे अन्नू कपूर यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. अन्नू कपूर यांनी रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांसारख्या आजच्या आघाडीच्या कलाकारांविषयी आपल्याला फारशी माहिती नसल्याचे म्हटले. एवढेच नव्हे तर, आपण या कलाकारांचे चित्रपट पाहिले नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. (Annu Kapoor )
View this post on Instagram
भानू पाठक यांच्या यूट्यूब चॅनलवरील एका मुलाखतीदरम्यान अन्नू कपूर यांना रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. आपण या कलाकारांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही, तसेच त्यांचे चेहरेही ओळखू शकत नसल्याचे ते म्हणाले. (Annu Kapoor )
त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, हे कलाकार आपल्यासमोर उभे राहिले तरी आपल्याला ते कोण आहेत, हे कदाचित ओळखता येणार नाही. रणबीर कपूरबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा मुलगा म्हणूनच आपल्याला रणबीरचे नाव माहीत आहे. मात्र, त्याच्या कामाबद्दल किंवा चित्रपटांबद्दल आपल्याला विशेष माहिती नाही. अन्नू कपूर यांच्या या विधानावरून मोठा गदारोळ निर्माण झाला असून सोशल मीडियावर नेटकरी त्यांना खडेबोल सुनावत आहेत. (Annu Kapoor )
अन्नू कपूर यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी अंताक्षरी, जॉली एलएलबी २, विकी डोनर, ड्रिम गर्ल, हमारे बारह, सात खूप माफ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष वेधक भूमिका साकारली आहे. अनेक दशकांच्या कारकिर्दीनंतरही ते सातत्याने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. (Annu Kapoor )





