सातारा | ‘आय लव्ह पाचगणी’ सेल्फी पॉईंटची पर्यटकांना भुरळ

Updated On:
सातारा | ‘आय लव्ह पाचगणी’ सेल्फी पॉईंटची पर्यटकांना भुरळ

पाचगणी(प्रतिनिधी) : जगप्रसिद्ध दोन नंबरच पठार व देशांतील स्वच्छतेच शहर म्हणुन प्रथम क्रमाकांच शहर असलेले पाचगणी शहराच्या प्रवेश द्वारावर उभारण्यात आलेल “आय लव्ह पाचगणी” हे वास्तुशिल्प पर्यटकांच्या व पाचगणी शहरातील नागरिकांच्या कुतूहलाचा केद्रबिंदु झालेले आहे. जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून नावलैकीक असलेल्या पाचगणी शहराला लाखो पर्यटक भेट देत असतात. मात्र पाचगणी शहरात प्रवेश करताच पाचगणी नगरपालिकेच्या माध्यमातुन नव्याने उभारण्यात आलेले “आय लव्ह पाचगणी” वास्तुशिल्प सेल्फी पॅाईट म्हणून नावारुपाला आले आहे. याठिकाणी पर्यटकांसह सर्वसामान्य पाचगणीकर सेल्फीचा मनमुराद आनंद लुटत आहे .

पाचगणी शहराच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पाचगणी नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात सातत्यपुर्ण चांगली कामगिरी करत आली आहे. पाचगणी शहराने देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्याच धर्तीवर सन 2022 च्या स्वच्छता अभियानात पुन्हा भाग घेत असताना  आम्ही “आय लव्ह पाचगणी” हे वास्तुशिल्प तयार केले आहे .

पाचगणी शहर जागतिक पर्यटन स्थळ आहे. भारतातून व जगातून येणाऱ्या पर्यटकांना पाचगणीची एक भुरळ आहे. पाचगणीवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी पाचगणी शहरात प्लॅस्टिक कचरा न टाकता इकोसेव्सटीव्ह पाचगणीत पर्यटन करताना इको टुरिजम वर भर द्यावा असे आवाहन  मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी “आय लव्ह पाचगणी” च्या माध्यामातुन केले आहे.

पाचगणी शहराच्या पर्यटन विविधतेत भर घालण्याच्या हेतूने मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी कल्पकतेने ‘आय लव पांचगणी’सेल्फी पॉइंट निर्माण केला आहे. या निर्मितीमुळे पाचगणीच्या भुरळ घालणाऱ्या निसर्ग सौंदर्यात मानवनिर्मित सेल्फी पॉइंटची भर पडली आहे. पर्यटक, तरुणाईलाच नव्हे, तर स्थानिकांना या ठिकाणी सेल्फी किंवा फोटो घेण्याचा मोह आवरता येत नाहीये.

आणखी संबंधित बातम्या

Accident: गणपतीपुळ्याकडे निघालेल्या साताऱ्यातील कदम कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात

2026-05-25 22:04:13

Accident: गणपतीपुळ्याकडे निघालेल्या साताऱ्यातील कदम कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात

Ambenali Ghat : आंबेनळी घाटात काळाचा घाला! साताऱ्यातील 8 तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू

2026-05-25 09:07:15

Ambenali Ghat : आंबेनळी घाटात काळाचा घाला! साताऱ्यातील 8 तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू

Shivendrasinghraje Bhosale: सातारा डिस्ट्रिक्ट क्रिकेट प्रीमियर लीगचा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ

2026-05-24 08:42:41

Shivendrasinghraje Bhosale: सातारा डिस्ट्रिक्ट क्रिकेट प्रीमियर लीगचा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ

Satara : महसूल थकविणाऱ्या गाळेधारकांवर कारवाईच प्रतीक्षा; सातारा पालिकेचे दुर्लक्ष

2026-05-24 08:33:16

Satara : महसूल थकविणाऱ्या गाळेधारकांवर कारवाईच प्रतीक्षा; सातारा पालिकेचे दुर्लक्ष

Koregaon News : बंद पडलेल्या शिवशाहीला ‘लालपरी’चाच आधार!

2026-05-24 08:27:19

Koregaon News : बंद पडलेल्या शिवशाहीला ‘लालपरी’चाच आधार!