‘मी माझा मुलगा गमावला’ सुशांतच्या जाण्याने नाना झाले भावुक

मुंबई – बॉलीवूड स्टार ‘सुशांतसिंह राजपूत’ने 14 (रविवार) जून रोजी आत्महत्या केल्याने चित्रपटसृष्टीसह अनेकांना धक्का बसला. या आत्महत्येनंतर संपूर्ण देशातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सुशांत त्याच्या मागे अनेक न सुटलेले प्रश्न सोडून गेला आहे. दरम्यान, या साऱ्यापासून दूर सुशांतचे कुटुंबीय मात्र अजूनही त्याच्या निधनाच्या दु:खातून सावरत आहेत. अश्यातच जेष्ठ अभिनेते ‘नाना पाटेकर’ यांची पावले सुशांतच्या घराकडे वळाली.
View this post on Instagram
नुकतंच नाना पाटेकर यांनी सुशांतच्या पाटणा येथील घरी जाऊन त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सुशांतच्या वडिलांना, त्याच्या कुटुंबीयांना धीर दिला. सुशांत एक अतिशय चांगला आणि उत्तम अभिनय सादर करणारा अभिनेता होता. तो आता या जगात नाही, यावर आपला विश्वासच नसल्याची भावना नानांनी व्यक्त केली.
सुशांत आपल्यामध्ये नसल्याचं दु:ख आपण अद्यापही पचवू शकलो नसून, मी माझाच मुलगा गमावल्यासारखं वाटत आहे, असं म्हणत नानाही भावूक झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुशांतसारखी मुलं फार कमी असतात. तो फारच लहान होता. या शब्दांत त्यांनी त्याच्या नसण्याची भावना व्यक्त केली.





