“कुठे काय घालायचं हे मला कळतं”; बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना रुचिराने सुनावले

Ruchira Jadhav On Trolling | अभिनेत्री रुचिरा जाधवला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. अभिनयासोबत रुचिरा तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. अनकेदा ती बिकिनीतील फोटो शेअर करताना दिसते. मात्र यामुळे तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. यावर आतातिने एका मुलाखतीत भाष्य करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
याबाबत रुचिरा म्हणाली की, “समुद्रावरचे स्विम सुट किंवा बिकिनी मधील फोटो जर मला सोशल मीडियावर टाकावेसे वाटले तर मी ते टाकत असते. मग याबद्दल लोक का त्यांचं एकत्रिकरण करतात. या दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत ना… तुम्ही बाकीचं ही प्रोफाइल पहा, ती सुद्धा मी आहे आणि ही सुद्धा मीच आहे. मला माझ्या दोन्ही बाजू कशा सांभाळायचा या माहित आहेत. कुठे काय घालायचं हे मला कळतं.”
पुढे ती म्हणाली, “मी मंदिरात साडी किंवा ड्रेस घालते. किंबहुना जशी असेल तशी जाते. समजा कधी मी शूट वरून लवकर फ्री झाले तर मी तोंडावर स्कार्फ गुंडाळून तिथे जाते. मंदिरात आपण मेकअप वगैरे करून जात नाही. त्यामुळे शूट वरून सुटल्यावर जर मला वाटलं की मंदिरात जायचं आहे तेव्हा मी फक्त नीट प्रेझेंटटेबल कपडे आहेत ना याची दक्षता घेते. Ruchira Jadhav On Trolling |
View this post on Instagram
“जीन्स पॅन्टमध्ये सुद्धा मी मंदिरात जाते”
“जीन्स पॅन्टमध्ये सुद्धा मी मंदिरात जाते, डोक्यावर स्कार्फ गुंडाळते. तिथे गेल्यावर माझ्या मनातला भाव माझ्या देवासाठी महत्त्वाचा असतो हे मला माहित आहे. त्यामुळे मंदिरात जाताना मी काय घालायचं काय नाही हे मला कळतं. समुद्रावर काय घालायचं हे मला माहित आहे त्यामुळे प्रेक्षकांना या गोष्टी कृपया मिक्स करू नका,” असे आवाहन देखील तिने केले. Ruchira Jadhav On Trolling |
रुचिरा जाधवच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत तिने गुरुनाथच्या गर्लफ्रेंडचे काम केले होते. त्यानंतर ती बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग झाली होती. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहे. Ruchira Jadhav On Trolling |
हेही वाचा:





