Anita Kanwal : मी कोणाकडेही पैसे मागितले नाहीत! ज्येष्ठ अभिनेत्री संतापली; थेट व्हिडिओ केला शेअर
Anita Kanwal : काही वृत्तवाहिन्या त्यांच्या विधानांचा विपर्यास करून त्यांना अतिरंजित स्वरूपात सादर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत आपली बाजू मांडली.

Anita Kanwal : ज्येष्ठ अभिनेत्री अनिता कंवल यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीबाबत प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही वृत्तवाहिन्या त्यांच्या विधानांचा विपर्यास करून त्यांना अतिरंजित स्वरूपात सादर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर सोशल मीडियावर उठलेल्या अफांवावर स्पष्टीकरण दिले.
आपण कोणाकडेही आर्थिक मदत मागितलेली नसून आपली आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेवर आपण भीक मागत नसून एका सधन कुटुंबातून येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुलाखतीतील विधानांचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप
सहा महिन्यांपूर्वी अनिता कंवल यांनी विकी लालवाणी यांना दिलेल्या मुलाखतीत काम मिळवताना येणाऱ्या अडचणींबद्दल भाष्य केले होते. काम मिळाले नाही, तर उपलब्ध बचतीच्या जोरावर त्या किती काळ आरामात राहू शकतील, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी आपल्याकडे एका वर्षासाठी पुरेशी बचत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांच्या या विधानाचा चुकीचा अर्थ लावून आर्थिक अडचणींचे चित्र रंगवण्यात आले.
View this post on Instagram
‘मला मुलांकडून पैसे घ्यायचे नसतील, तर इतरांकडून का घेईन?’
आपल्या आर्थिक परिस्थितीबाबतच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना अनिता कंवल म्हणाल्या, “मी आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याचे सांगून या बातम्या सनसनाटी का बनवल्या जात आहेत? तसे अजिबात नाही. मी पूर्णपणे ठीक आहे आणि माझी आर्थिक परिस्थितीही चांगली आहे. मी केवळ माझे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. जर मला माझ्या मुलांकडून पैसे घ्यायचे नसतील, तर मी दुसऱ्या कोणाकडून पैसे का घेईन?” असा थेट सवाल त्यांनी विचारला.
अनिता कंवल कोण आहेत?
अनिता कंवल या ७२ वर्षांच्या असून त्यांनी छोट्या पडद्यावर विविध मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय काही बड्या चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या पण लक्षात राहणाऱ्या भूमिकाही साकारल्या आहेत.’चाणक्य’, ‘बनेगी अपनी बात’ आणि ‘ससुराल गेंदा फूल’ यांसारख्या मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या. याशिवाय ‘कभी हां कभी ना’ आणि ‘गंगाजल’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे.
Kanhe Gram Panchayat : पाण्याचा प्रत्येक थेंब जपा; कान्हे ग्रामपंचायतीचे आवाहन





