मुंबई -शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. एवढेच नाही तर नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती असा दावाही केसरकरांनी केला आहे. या टीकेवर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केसरकरांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरींनी खोचक ट्वीट करत दीपक केसरकरांना टोला लगावला आहे. केसरकर साहेब सद्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणुन आहात.
तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लावू नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही. असेही ते म्हणाले.