‘पथकाशी माझा काहीही संबंध नाही…’; आस्ताद काळेची ‘कलावंत’ पथकातून एक्झिट, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, नेमकं कारण….

Actor Aastad Kale | मराठमोळा अभिनेता अस्ताद काळेने नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयासह अस्ताद त्याच्या परखड मतांमुळे देखील ओळखला जातो.
काही दिवसांपूर्वी अभिनेता चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरून ट्रोल करण्यात आले होते. यावर देखील अस्ताद काळेने आपलं मत भाष्य केलं होत. मात्र, अश्यातच या अभिनेत्याबद्दल आणखी महत्वाची उपडेट समोर आली आहे.
गणपती बाप्पाच्या मिरवणुकांमध्ये विशेष शोभा असते ती ढोलताशा पथकांची. असंच एक पथक प्रेक्षकांच्या ओळखीचं आहे ते म्हणजे कलावंत ढोलताशा पथक. हे पथक प्रेक्षकांच्या आकर्षणाची गोष्ट ठरतं कारण यात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी होतात.
महत्वाचं म्हणजे कलाकारांनीच या पथकाची स्थापना केली आहे. मात्र आता अभिनेता आस्ताद काळे याने या पथकाकडे पाठ फिरवली आहे. स्वतः अभिनेत्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
आस्तादने कलावंत पथक यामधून काढता पाय घेतला आहे. तो म्हणाला की, ‘नमस्कार. मी कलावंत पथक सोडलं आहे. या पथकाशी त्याच्या मिरवणुकांशी, वादनांशी माझा काहीही संबंध नाही.
तेव्हा नवीन सभासद नोंदणी, तालमींचं वेळापत्रक, मिरवणुका इ. संबंधी मला संपर्क करु नये. धन्यवाद”, असं म्हणत त्याने पथकाला रामराम केला असल्याचं सांगितलं आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मात्र, आस्ताद काळे याने हे पथक नेमकं कोणत्या कारणामुळे सोडलं आहे हे अद्याप समजू शकलं नाही.
‘कलावंत’ ढोलताशा पथकातील कलाकार मंडळी :
अजय पुरकर, आस्ताद काळे, सौरभ गोखले, श्रुती मराठे, शाश्वती पिंपळकर, प्राजक्ता हणमघर, माधवी सोमण, ज्योती मालशे, तेजस्विनी पंडित, हृषीकेश जोशी, प्रसाद ओक, ऋजुता देशमुख, पीयूष रानडे, मयूरी वाघ, अनुजा साठे, परी तेलंग, केतन क्षीरसागर, श्रीकार पित्रे, प्रसाद जवादे, राधिका देशपांडे, मधुरा देशपांडे, नूपुर दैठणकर, तेजश्री वालावलकर, अश्विनी कुलकर्णी, बिपीन सुर्वे ही कलाकार मंडळी पथकात आहेत.





