Archana puran singh : “चित्रपटाच्या शूटिंगवेळी गर्भपात झाला…”; अर्चना पूरण सिंहने शेअर केला कठीण प्रसंग
Archana puran singh : अभिनेत्री अर्चना पूरण सिंह एक उत्तम अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते. याशिवाय अर्चनाचा स्वत:चा एक युट्यूब चॅनेल आहे. ती अनेकदा त्यावर वेगवेगळे व्लॉग शेअर करत असते.
त्यामाध्यमातून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर ती भाष्य करताना दिसते. नुकतेच तिने तिच्या कठीण काळातील एक प्रसंग सांगितला आहे.
लेटेस्ट व्हिडीओमधून अर्चनाने तिच्या गर्भपाताचा प्रसंग सांगत, त्यावेळी परमीत त्यांच्याबरोबर नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
यावेळी परमीत यांनीसुद्धा त्यावेळी त्यांना तितकी समज नव्हती आणि या गोष्टीबद्दल जागृकताही कमी होती म्हणून असं घडल्याचं सांगितले.
अर्चना म्हणाली की, “लग्नाच्या चार वर्षांनंतर मी गरोदर राहिले होते, पण मी एका चित्रपटासाठी काम करत असताना माझा गर्भपात झाला. मला सतत भूक लागायची, मला कळलं नाही पण मी गरोदर होते. मला मूल हवं होतं, त्यामुळे त्या गर्भपातामुळे मला दु:ख झालं.”
पुढे त्या प्रसंगाबद्दल बोलताना परमीत म्हणाले, “तू ज्या परिस्थितीतून जात होती ते पाहून मला असं वाटलेलं की आपल्याला मुलं व्हायलाच हवी असं काही नाही. मी फक्त तुझ्याबरोबरही आनंदी होतोच. आपण इतके जवळ होतो की आपल्यामध्ये दुसऱ्या कोणासाठी जागाच नव्हती.” परमीत यांना त्यावेळी मातृत्वाबद्दल तितकी जाण नव्हती, असेही म्हटलं. Archana puran singh :
‘एसी भी क्या जलीदी’ या चित्रपटासाठी काम करत असताना त्यांचा गर्भपात झाल्याचं अर्चना म्हणाली, “मी ३४ वर्षांची होते आणि मला माझं खूप वय आहे असं वाटत होतं आणि कदाचित कधीच मुलं होणार नाहीत अशी भीती होती.
मी बँकाँकमध्ये असताना त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर त्या त्वरीत भारतात आल्या, पण त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते. त्यावेळी त्या भावनिकदृष्ट्या कठीण काळातून जात असतानाच गरोदर असल्याचं कळलं आणि त्यावेळी परमीत फुटबॉल खेळायला जात होता.” Archana puran singh :
त्यावर परमीत सेठी पुढे म्हणाले, ‘मी त्यावेळी तुला समजून घेतलं नाही, मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. तुला पूर्णपणे बेड रेस्ट करायला सांगितलेलं आणि मी फुटबॉल खेळायला जात होतो. जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्ही स्वत:पुरता विचार करता. तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे धावत असता आणि मला मी काय करत आहे हे कळत नव्हते.”
हेही वाचा:





