Arjun Rampal : बॅालिवूड अभिनेत्री करिना कपूर अर्थात सर्वांची लाडकी बेबो हिने इंडस्ट्रीत आपला एक मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. खरंतर बिबोने आजपर्यंत अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ती अनेक कारणांमुळे चर्चेतही असते. मात्र, अभिनेता अर्जुन रामपाल याच्यासोबत अभिनेत्री करिना कपूर हिने हिरोईन नावाच्या सिनेमात अभिनय केला होता. या सिनेमातील एका इंटिमेंट सीनमुळे करिना कपूर चर्चेत आली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन रामपाल याने मला बेबोसोबत इंटिमेट होण्यात खूप मज्जा आली. मला अजूनही तिच्यासोबतचा लव्ह मेकिंग सीन आठवतो, असं अर्जुनने सांगितल्याने याबाबत त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. २०१२ मध्ये हिरोईन नावाचा सिनेमा रिलीज झाला होता. तब्बल १३ वर्षांनी अर्जुन रामपाल याने दिलेल्या मुलाखतीत करिना कपूरसोबत केलेल्या इंटिमेट सीनबाबत असं म्हटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे नेटकऱ्यांनी त्याला या विधानाला घेऊन चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळतं आहे. हिंदुस्थान टाईम्सला अभिनेता अर्जुन रामपालने मुलाखत दिली आहे. त्या मुलाखती त्याने याबाबत सांगितलं आहे. “मला बेबोसोबत इंटिमेट होण्यात खूप मज्जा आली. मला अजूनही तिच्यासोबतचा लव्ह मेकिंग सीन आठवतो…” आता यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, “हे खूप विचित्र आणि अनप्रोफेशनल आहे. अभिनेता अर्जुन रामने हिंदी सिनेमात विविध ढंगाच्या भूमिका साकारेल्या आहेत. त्याचे गेले काही सिनेमे बॅाक्स अॅाफिसवर फार काही कमा करू शकले नाहीत. हेही वाचा : वाराणसीतील आत्मविश्वेश्वर मंदिरात आग ; ७ जणांचा होरपळून मृत्यू