“मी कपडे आणि दागिने उधारीवर घेते” झीनत अमान यांचा खुलासा; तरुणांनाही दिला ‘हा’ सल्ला

मुंबई – बॉलीवूडमधील अनेक कलाकारांची स्टाइल तरुण वर्ग फॉलो करताना दिसतो. यासाठी अनेक जण महागडे कपडे खरेदी करण्यात पैसे वाया घालवतात. मात्र अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) या इतर सेलिब्रिटींपेक्षा वेगळ्या आहेत. झीनत कपडे आणि दागिने यावर अधिक खर्च न करता या वस्तू उधारीवर घेतात. याबाबत त्यांनी एका पोस्टद्वारे खुलासा केला आहे. इतकंच काय तर तरुणांना देखील एक मोलाचा सल्ला दिला आहे.
इनस्टाग्रामवर झीनत अमान यांनी मुलगा जहान खान आणि सूनेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये झीनत यांनी निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत झीनत यांनी “माझं लग्न खूप साध्या पद्धतीने झाले आहे. लग्नानंतर आम्ही सिंगापूरला पळून गेलो होतो,” असे सांगितले आहे.
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “भारतात लग्नसोहळ्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. सध्या मोठा प्रमाणात शाही विवाहसोहळे पार पडतात. जेवण, संगीत असं सर्वत्र आनंददायी वातावण असतं. लग्नसोहळ्यातील माहोल कमाल असतो. दिल्लीत एका लग्नसोहळ्यातील हा फोटो आहे.
View this post on Instagram
“मी डिझायनर आऊटफिट परिधान करते. ते कपडे मी उधारीवर घेते. दागिने देखील मी भाड्याने घेते. तरुणांनी कपड्यांवर जास्त खर्च करू नये म्हणून मी ही गोष्ट शेअर केली आहे. तरुणांनी बँक खातं रिकामं करू नये. चांगले कपडे परिधान करायचे असतील तर ते भाड्याने घ्या,” असा सल्ला देखील त्यांनी यावेळी तरुण वर्गाला दिला.
दरम्यान, 71 वर्षीय झीनत अमान यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’,’ ‘धर्म वीर’, ‘यादों की बारात’ यासारखे त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले होते. सध्या त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेक वैयक्तिक आयुष्यातील आणि इतर काही गोष्टी त्या नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात.





