‘मी, राज्यसभेचा सदस्य म्हणून…’; उज्ज्वल निकमांनी मराठीतून घेतली खासदारकीची शपथ

Ujjwal Nikam | ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. विशेष म्हणजे उज्जवल निकम यांनी मराठी मधून राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली.उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेतील पराभवानंतर निकम यांचे आता खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
खासदारकीच्या निवडीनंतर पत्रकार परिषदेत उज्जवल निकम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी त्यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. मराठीत बोलू की हिंदीत बोलू असे ते म्हटले. मी त्यांना तुमचे दोन्ही भाषेवर प्रेम आहे असे म्हटले. त्यानंतर त्यांनी माझ्याशी मराठीतून संवाद साधला असल्याचे सांगितले होते. Ujjwal Nikam |
टतसेच पंतप्रधान म्हणाले होते की, राष्ट्रपती महोदय तुमच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवू इच्छितात. तुम्ही ही जबाबदारी देशाच्या दृष्टिकोनातून चांगली सांभाळाला याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो,’ असे उज्ज्वल निकम यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज निकम यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. दरम्यान, यावेळी निकम यांचे कुटुंब देखील याठिकाणी उपस्थित होतं. Ujjwal Nikam |
मराठीतून घेतली खासदारकीची शपथ
‘मी, राज्यसभेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमिकता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे काही कर्तव्य मी हाती घेणार आहे, ते निष्ठापूर्वक पार पाडीन,’ असे निकम यांनी शपथ घेताना म्हटले. Ujjwal Nikam |
दरम्यान, उज्ज्वल निकम यांच्याबरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. Ujjwal Nikam |
हेही वाचा :





