“मी अजूनही कामाच्या संधीची वाट पाहत….”; हिरामंडी वेबसिरीजनंतर कोणतही नवं काम नाही: ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

Bollywood actress Aditi Rao : नेटफ्लिक्सवरील संजय लीला भन्साळी दिग्दर्शित “हिरामंडी: द डायमंड बाजार” ही वेबसिरीज अत्यंत लोकप्रिय ठरली. या सिरीजमध्ये बॅालीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने बिब्बोजान ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. मात्र, नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने खंत व्यक्त केली आहे.
हिरामंडी या भव्य सिरीजने अदितीला मोठं यश मिळवून दिले. मात्र, या सिरीजनंतर तिला कोणतीही सिरीज किंवा चित्रपटाची अॅाफर मिळालेली नाही. मी अजूनही कामाच्या संधीची वाट पाहत असल्याची खंत अभिनेत्री अदिती राव हैदरीने व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
“हिरामंडी मालिकेमुळे मला प्रचंड प्रेम आणि प्रशंसा मिळाली. प्रेक्षकांनी आणि इंडस्ट्रीतील लोकांनी माझं काम आवडलं असल्याचं सांगितलं. पण या यशानंतरही अजूनपर्यंत मी काहीच नवीन प्रोजेक्ट साइन केले नाही. मी अजूनही कामाच्या संधींची वाट पाहतेय.”, असे अभिनेत्री अदिती राव हिने मुलाखती दरम्यान सांगितले. तिने केलेल्या या विधानामुळे बॉलिवूडमधील सुरू असलेली स्पर्धा पुन्हा एकदा अधोरिखेत झाली आहे.
View this post on Instagram
तसेच महिला कलाकारांसमोरील संधींच्या मर्यादा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या काळात अदितीने अभिनेता सिद्धार्थसोबत लग्न केले असून आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात केली आहे. करिअरमधील ‘ड्राय स्पेल’मुळेच लग्नाचा निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: ५ दिवसांत दुसरा CDS ठार ! इस्रायलचा इराणवर आणखी एक मोठा हल्ला ; जाणून घ्या अली शादमानी कोण होते ?





