Nitish Kumar : “मला राज्यसभेचा सदस्य होण्यात जास्त रस आहे…” – नितीश कुमार
तुमच्या विश्वास आणि पाठिंब्यामुळेच आज बिहार विकास आणि आदराचा एक नवीन आयाम अनुभवत आहे. (Nitish Kumar)

Nitish Kumar – मला राज्यसभेचा सदस्य होण्यात जास्त रस आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये मला अनेक लोकोपयोगी कामे करता येतील. दोन दशकांहून अधिक काळ तुम्ही सातत्याने तुमचा विश्वास आणि पाठिंबा कायम ठेवला आहे. त्या बळावर आम्ही बिहारची आणि तुमच्या सर्वांची पूर्ण निष्ठेने सेवा केली आहे.
तुमच्या विश्वास आणि पाठिंब्यामुळेच आज बिहार विकास आणि आदराचा एक नवीन आयाम अनुभवत आहे. मी यापूर्वी अनेक वेळा याबद्दल तुमचे आभार मानले आहेत, असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयु नेते नितीश कुमार यांनी समाज माध्यमात म्हटले आहे. Nitish Kumar
विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे गेल्या २१ वर्षांपासून असलेल्या बिहारच्या प्रमुखपदावरून पायउतार होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा परिस्थितीत प्रथमच भाजपाचा नेता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊ शकतो. नितीश राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करणार असल्याची चर्चा होती. आता, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः याची घोषणा केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये नितीश कुमार लिहितात की, माझ्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासूनच मला बिहार विधिमंडळ आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य होण्याची इच्छा होती.
या अनुषंगाने, मी या निवडणुकीत राज्यसभेचा सदस्य बनण्याचा प्रयत्न करीत आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे खात्री देतो की तुमच्याशी असलेले हे नाते भविष्यातही कायम राहील आणि विकसित बिहार बांधण्यासाठी एकत्र काम करण्याचा माझा संकल्प अढळ राहील. स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला माझे पूर्ण समर्थन आणि मार्गदर्शन असेल.
प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री… (Nitish Kumar)
गेल्या अनेक दिवसांपासून नितीश कुमार राज्यसभेसाठी निवडणूक लढवू शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. सुरुवातीला त्यांचा मुलगा निशांत राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. पण बुधवारी अचानक नितीश कुमार यांचे नाव समोर आले. निशांत हे त्यांचे वडील नितीश कुमार यांची जागा घेतील.
बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री असेल. बिहारमध्ये एकूण २४३ जागा आहेत. त्यात जदयुकडे ८५ जागा आहेत आणि भाजपाकडे ८९ जागा आहेत. तिसरा लोकजनशक्ती पक्षाकडे १९, हिंदुस्तानी अवामी मोर्चा (सेक्युलर) कडे ५ आणि राष्ट्रीय लोक मोर्चाकडे ४ जागा आहेत.
स्वत:कडे जास्त जागा असूनही भाजपाने जदयुकडेच मुख्यमंत्रीपद दिले होते. आता नितीशकुमार यांच्या जागी नंतर पोटनिवडणूकही होईल. लवकरच भाजपा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करेल.






