उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहे, हे पाहून मला आनंद होतोय – भुजबळ
Updated On:

मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन होत आहे.
शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. संध्याळाकी ६ वाजून ४० मिनिटांनी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. भुजबळ म्हणाले, “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होताना पाहणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, मी २५ वर्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात काम केलं आहे.
आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहे, हे पाहून मला आनंद होतोय’, असं ते म्हणाले. आज एका कार्यक्रमात छगन भुजबळ बोलत होते.





