Hyderabad Trainee Aircraft Crash : हैदराबादमध्ये भीषण अपघात; प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, 2 पायलट ठार
Updated On:

Hyderabad Trainee Aircraft Crash : तेलंगणातील हैदराबादमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी हवाई दलाचे पिलाटस ट्रेनर विमान क्रॅश झाले आहे. दरम्यान, या अपघातात विमानातील दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
डुंडीगल येथील वायुसेना अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान हे विमान कोसळले. विमान अपघाताबाबत, भारतीय वायुसेनेने एक निवेदन प्रसिद्ध करून या अपघाताविषयी माहिती दिली.
वायुसेनेने आपल्या निवेदनात, “हैदराबादहून नियमित प्रशिक्षण उड्डाण करताना आज सकाळी एक Pilatus PC 7 Mk IL ट्रेनर विमान क्रॅश झाले. “आम्हाला खेद वाटतो की विमानातील दोन्ही पायलट गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.”असल्याचे म्हटले आहे.
मात्र, या अपघातात एकही नागरिक जखमी झाला नाही, ही चांगली गोष्ट आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.





