Navneet Rana | भाजपाच्या नेत्या, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा यांना कोर्टाने ही नोटिस बजावली आहे. त्यानुसार त्यांना येत्या २८ फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. नवनीत राणा यांनी हैदराबादला जाऊन खासदार ओवेसींना आव्हान देत केलेल्या वक्तव्याप्रकरणी हैदराबाद न्यायालयाने नवनीत राणांना समन्स पाठवला आहे. नेमकं प्रकरण काय? नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान ओवैसींना आव्हान दिले होते. या प्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा दरम्यान 15 मिनिटांसाठी पोलिस हटवा मग आम्ही दाखवतो. आम्ही काय करु शकतो ते? असे वक्तव्य केले होते. या प्रकरणात हैदराबादमधील भाजपा उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी ओवैसींना प्रत्युत्तर देत ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, त्या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, त्यांचा पत्ता देखील लागणार नाही ते कुठेन आले होते आणि कुठे गेले, असे राणा म्हणाल्या होत्या. Navneet Rana | याच वक्तव्याप्रकरणी ओवैसी यांनी न्यायालयामार्फत नवनीत राणा यांना नोटीस पाठवली. त्याच नोटीसला उत्तर देण्यासाठी कोर्टाने नवनीत राणा यांना हैदराबाद कोर्टात 28 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. ओवैसी यांच्या बद्दल नवनीत राणा यांनी केलेलं वक्तव्य त्यांच्या अडचणीत वाढ निर्माण करू शकतात. Navneet Rana | हेही वाचा: “हे चिंताजनक आहे, चौकशी सुरू” ; यूएसएआयडी निधी वादावर एस जयशंकर यांची प्रतिक्रिया