“हे चिंताजनक आहे, चौकशी सुरू” ; यूएसएआयडी निधी वादावर एस जयशंकर यांची प्रतिक्रिया

S Jaishankar on USAID । अमेरिकन यूएसएआयडी निधीवरून भारतात राजकारण तापले आहे. त्यातच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आता त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतातील निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स पाठवण्यात आल्याचा दावा ट्रम्प आणि अमेरिकन प्रशासनाने केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच हा मुद्दा उपस्थित केला होता. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात, ट्रम्प प्रशासनाने मांडलेली माहिती निश्चितच चिंताजनक आहे.केंद्र सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे.” असे त्यांनी म्हटले.
जयशंकर यांनी व्यक्त केली चिंताजनक S Jaishankar on USAID ।
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या कार्यक्रमात, यूएसएआयडीला चांगल्या हेतूने भारतात काम करण्याची परवानगी देण्यात आली होती परंतु आता अमेरिकेकडून असे संकेत मिळत आहेत की काही कारवाया दुर्भावनापूर्ण होत्या. ते म्हणाले की, हे चिंताजनक आहे आणि जर त्यात काही असेल तर देशाला माहित असले पाहिजे की त्यात कोण सामील आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “अमेरिकेकडून (यूएसएआयडी) मिळालेल्या निधीचा वापर भारतातील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी केला जात आहे.
USAID निधीची चौकशी सुरूच S Jaishankar on USAID ।
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नुकतेच, “अमेरिकन प्रशासनाने युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) शी संबंधित दिलेल्या माहितीची संबंधित विभाग आणि एजन्सींकडून चौकशी केली जात आहे. ते म्हणाले, “यूएसएआयडीच्या काही उपक्रमांबद्दल आणि निधीबद्दल अमेरिकन प्रशासनाने दिलेली माहिती आम्हाला दिसली आहे. ही माहिती स्पष्टपणे खूप त्रासदायक आहे. यामुळे भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये परकीय हस्तक्षेपाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. संबंधित विभाग आणि एजन्सी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात मतदान वाढविण्यासाठी यूएसएआयडीच्या माध्यमातून २१ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यामागील बायडेन प्रशासनाच्या हेतूंवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ट्रम्प म्हणाले, “भारतात मतदानासाठी २१ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्याची काय गरज होती? मला वाटते की ते दुसऱ्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करत होते. आपल्याला भारत सरकारला सांगावे लागेल..”असे त्यांनी म्हटले.





