Women’s Hockey World Cup 2022 : भारताचा न्यूझीलंडकडून निसटता पराभव
Updated On:

ऍमस्टेलवीन – विश्वकरंडक महिला हॉकी स्पर्धेतील शुक्रवारी झालेल्या लढतीत भारताच्या महिला संघाला 4-3 असा न्यूझीलंडकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताकडून वंदना कटारियाने चौथ्या मिनिटाला गोल करत आघाडी घेतली होती. लालेरसियामीने 44 तर, गुरजीत कौरने 59 व्या मिनिटाला गोल केले.
न्यूझीलंडकडून ऑलिव्हिया मेरीने 12 व 54 व्या मिनिटाला गोल केले. तर, टेसा जोपने 29 व फ्रान्सी डेव्हीसने 32 व्या मिनिटाला गोल केले. भारताला या सामन्यात तब्बल 15 पोनल्टी कॉर्नर मिळाले होते. मात्र, त्याचा लाभ त्यांना घेता आला नाही.





