हुतात्मा जवान संदीप सावंत अनंतात विलीन
Updated On:

कराड : अमर रहे..अमर रहे..शहीद जवान संदीप सावंत अमर रहे… वंदे मातरम… भारत माता की जय अशा घोषणा देत शुक्रवारी मुंढे (ता. कराड) येथे हुतात्मा जवान संदीप सावंत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवानाला अखेरचा निरोप देताना हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
जम्मू- काश्मीरमधील नौशेरा येथे नियंत्रण रेषेवर घुसखोरांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलातील जवान संदीप रघुनाथ सावंत हे हुतात्मा झाले होते. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.





