सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांदरम्यान पती झहीरने दिली मजेशीर रिअॅक्शन, व्हिडिओ व्हायरल

Sonakshi Sinha Pregnancy | बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल कायम मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा झहीर सोनाक्षीसोबत मस्ती करताना दिसतो. आता मात्र या क्यूट जोडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल लवकर आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये झहीर आणि सोनाक्षी मुंबईत एक कार्यक्रमात दिसले. त्यांनी पारंपरिक लूक केला होता. सोनाक्षी सिन्हाने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. सिंदूर, बिंदी तिने लावली होती. मोकळे केस सोडले होते. मिनिमल मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला होता. तेव्हा फोटो काढताना सोनाक्षी स्वतःला सावरत पोटावर हात ठेवताना दिसली. तसेच ओढणीने बेबी बंप लपवताना दिसली. त्यामुळे सोनाक्षी गरोदर असल्याची चर्चांना उधाण आले आहे. Sonakshi Sinha Pregnancy |
View this post on Instagram
यानंतर आता दोघांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात झहीर सोनाक्षीला हळू चालण्यास सांगतो. त्यानंतर तो पुन्हा तिच्या पोटाला स्पर्श करून ‘बेबी बंप’ लपवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सोनाक्षी देखील हसत हसत त्याला रोखण्याचा प्रयत्न करते. मात्र अद्यापही दोघांकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, सोनाक्षी सिन्हाने 2024 मध्ये झहीर इक्बालसोबत रजिस्टर मॅरेज केले. सोनाक्षीने सात वर्ष डेट केल्यानंतर अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी मुंबईत धमाकेदार पार्टी सुद्धा केली.
हेही वाचा:





