धक्कादायक..! पतीनेच केला पत्नीचा गळा दाबून खून; मृतदेह दुचाकीवर नेताना बिंग फुटले

Pune Crime : पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. मृतदेह दुचाकीवरून घेऊन जाताना आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. राकेश रामनायक निसार असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश मृतदेह घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांच्या गस्ती पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले. तपासणीत बबिताचा मृतदेह आढळून आला आणि खूनाचा प्रकार उघडकीस आला. राकेशने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, पती राकेश रामनायक निसार याने आपली पत्नी बबिता राकेश निशार हिचा खून केला आहे. नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपी पती भूमकर पुलाकडून बायकोचा मृतदेह घेवून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी गस्ती पथकाने संशयावरून त्याला ताब्यात घेतले.
तपासणीत बबिताचा मृतदेह आढळून आला आणि खूनाचा प्रकार उघडकीस आला. राकेशने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.ही कारवाई मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा नोंदवून राकेश याला अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.





