नवरा रुसला, टॉवरवर जाऊन बसला आणि म्हणाला…

येवला – पती पत्नीचे नाते म्हंटले की प्रेम आणि वाद आलेच. बायकोची कटकट किंवा त्रास कधी संपतो असंही काही जणांना वाटतं. पण बायकोचा धाक आणि प्रेम दोन्ही नाही म्हटलं तरी प्रत्येक पतीला हवं असतं. तिची कटकट वाटली तरी सुद्धा हा वाद टोकाला गेला तर त्याचाही जीव वरखाली होतो. आता बातमी अशाच एक विरूची आहे.
भांडण झालं आणि त्याचा राग मनात घेऊन बायको थेट माहेरी निघून गेली. बायको घर सोडून गेल्याने तिचा विरह सहन झाला नाही. राग शांत झाल्यावर नवऱ्याला बायकोची आठवण येऊ लागली. मात्र बायको काही मानायला तयार नाही.
अखेर बायकोचा विरह सहन न झाल्याने नवऱ्याने चक्कर दारू पिऊन BSNL च्या टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन करत बायकोने नांदायला यावे अशी मागणी केली.
ही घटना निफाड तालुक्यातील जळगाव फाट्यावर घडली आहे. दिलीप मोरे असे याचे नाव असून तब्बल तीन तास हा ड्रामा चालू होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलीस आणि नागरिकांना या विरुला खाली उतरवण्यात यश आले.





