पुणे | विशेष शिक्षकांचे भरपवासात उपोषण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील दिव्यांग शाळांमध्ये १,७७५ विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर दिव्यांग विद्यार्थी-पालक आणि विशेष शिक्षक भर पावसात बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
मागील १२ ते १८ वर्षांपासून हे १७७५ विशेष शिक्षक अल्प मानधनात करार पद्धतीने कार्यरत आहेत. या “लाडक्या’ बहिणी आणि भावांना कायम करून दिव्यांग विद्यार्थी आणि विशेष शिक्षकांना न्याय कधी देणार, असा प्रश्न दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सरताज पठाण यांनी उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयाने १२ मार्च २०२४ च्या आदेशामध्ये स्पष्टपणे दिव्यांग विद्यार्थी संख्येनुसार विशेष शिक्षक पद निर्मिती करून कार्यरत विशेष शिक्षकांना सामावून घेण्यात यावे] असे नमूद केले आहे. त्यासाठी दिव्यांग कल्याण विशेष शिक्षक संघटनेने आझाद मैदान मुंबई येथे सलग ९ दिवस आंदोलन केले, अशी माहिती सचिव राजीव चव्हाण यांनी यावेळी दिली.




