पुण्यातून जाणाऱ्या शेतमजुराचा भूकबळी
Updated On:

बीड – पुण्याहून परभणीकडे पायी निघालेल्या मजुराचा भूक आणि डिहायड्रेशनमुळे बीड जिल्ह्यात मृत्यू झाला.
पिंटू पवार असे या ऊसतोड मजुराचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील धानोरा येथे सोमवारी पिंटू पवार हा मृतावस्थेत आढळला. शवविच्छेदन अहवालातून 15 मे रोजी जास्त प्रमाणात चालणे, भुकेने आणि डिहायड्रेशनमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हा तरुण परभणीतील मानवत तालुक्यातील होता. पुणे जिल्ह्यात ऊसतोड मजूर म्हणून तो काम करीत होता. लॉकडाऊननंतर तो पुण्यात आपल्या भावाच्या घरी गेला. तेथून 8 मे रोजी चालत घरी निघाला. धानोरा येथे शेडखाली विश्रांतीसाठी थांबला. तेथेच त्याचा मृत्यू झाला.





