‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये हुमाची एंट्री

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची मोस्ट अवेटेड फिल्म ‘गंगुबाई काठियावाडी’ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. करोनाच्या साथीदरम्यान “गंगुबाई…’ला वारंवार पुढे ढकलले गेले होते. मात्र आता 25 फेब्रुवारी 2022 रोजी ‘गंगुबाई…’ मोठ्या पडद्यावर रिलीज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या चित्रपटात अभिनेत्री हुमा कुरैशी देखील विशेष भूमिकेत दिसून येणार आहे. तिने सोशलवर पोस्ट शेअर केली आहे की, ‘चालू महिन्यात माझी वेबसीरिज मिथ्या प्रदर्शित होतेय. तर दुसरीकडे भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटात मी विशेष भूमिका साकारत असल्याने अत्यंत उत्सुक आहे.’
दरम्यान, गंगुबाईच्या जीवनावरील हा सिनेमा प्रसिद्ध लेखक हुसैन जैदीचे पुस्तक ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ मधील एका प्रकरणातून आकाराला आले आहे. 1960 च्या दशकात मुंबईतील कामाठीपुरा भागातील भागात गंगुबाईचा मोठा दबदबा होता. भन्साळींच्या प्रॉडक्शन हाउसने केलेल्या ट्विटला एक समर्पक कॅप्शनही देण्यात आली आहे. ‘शक्ती, साहस आणि निडरतेसह यांचा उदय बघा’ असे या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.





