Huma Qureshi : हुमा कुरेशी पोहचली जम्मू काश्मिरमध्ये; बीएसएफ सैनिकांसोबत सुंदर फोटो केले शेअर

Actress Huma Qureshi : भारतीय सैन्याने अॅापरेशन सिंदर राबवून पाकिस्ताला जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर देशात केंद्र सरकारने केलेल्या या मोहिमचे कौतुक भारतवासीयांनी केले. बॅालीवूड इंडस्ट्रीतील कलाकरांनी देखील या मोहिमेचे कौतुक करत पोस्ट लिहिल्या.
बॅालीवूडमधील प्रसिद्ध् अभिनेत्री हुमा कुरेशीने जम्मू आणि काश्मीरला भेट दिली. जिथे ती बीएसएफ जवानांमध्ये दिसली. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत हुमा बीएसएफ सैनिकांसोबतचे सुंदर क्षण शेअर केले आहेत.
अभिनेत्री हुमा कुरेशीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती जम्मूचे वातावरण अनुभवताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये ‘जम्मूमधून पोस्टकार्ड’ असे लिहिले आहे. या फोटोत ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्या महिला सैनिकांनी उत्तम उत्साह दाखवला त्यांच्यासोबत हुमा दिसत आहे.
View this post on Instagram
याशिवाय, दुसऱ्या एका फोटोत हुमा बीएसएफ सैनिकांशी बोलताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संभाषणात हुमा कुरेशीने ऑपरेशन सिंदूरमधील भूमिकेबद्दल आणि देशाच्या सीमांचे रक्षण केल्याबद्दल सैन्याचे कौतुक केले आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये, अभिनेत्रीने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात प्रभावित झालेल्या लोकांना भेटताना दिसत आहे. याशिवाय, ती त्यांचे सांत्वन केले आहे. याशिवाय, तिने जम्मू काश्मिरमधील नैसर्गाचे देखील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
हुमा कुरेशीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती आगामी वेब सीरिज ‘महाराणी ४’ मध्ये दिसणार आहे. यामध्ये, ती पुन्हा एकदा राणी भारतीच्या भूमिकेत आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे.





