Huma Qureshi : बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सध्या मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. हुमा हिने बॉयफ्रेंड रचित सिंहसोबत गुपचूप साखरपुडा केल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांना सुरुवात झाली ती तिची मैत्रीण, गायिका अकासा सिंगच्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे. अकासाने हुमा आणि रचितसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं, “रचित व हुमा तुम्ही तुमच्या Piece of Heaven ला एक नाव दिल्याबद्दल अभिनंदन. ही रात्र खूप खास होती.” हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साखरपुड्याच्या चर्चा जोर धरू लागल्या. रचित सिंह कोण आहेत? हुमा कुरेशी आणि रचित सिंह गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ एकत्र आहेत. मार्च २०२४ मध्ये शाहरुख खान-गौरी खान यांच्या पार्टीत एड शीरनसोबत ते पहिल्यांदा पब्लिकली दिसले होते. रचित सिंह हे अॅक्टिंग कोच असून त्यांनी आलिया भट्ट, रणवीर सिंह आणि विकी कौशल यांसारख्या मोठ्या कलाकारांना प्रशिक्षण दिलं आहे. तसेच ते रवीना टंडनच्या कर्मा कॉलिंग या सीरिजमध्येही दिसले होते. दोघांची प्रतिक्रिया नाही हुमा आणि रचित यांच्या साखरपुड्याच्या बातम्या जोरात आहेत, मात्र या दोघांनीही अद्याप अधिकृतरीत्या काही प्रतिक्रिया दिलेली नाही. हुमाचे आगामी प्रोजेक्ट्स हुमा कुरेशी नुकतीच ‘मालिक’ चित्रपटात दिसली होती, ज्यात तिने आयटम साँग केलं होतं. आता ती अक्षय कुमारसोबत ‘जॉली एलएलबी 3’ मध्ये झळकणार आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हुमा ‘पूजा मेरी जान’ या सिनेमात आणि’ महारानी 4′ या वेबसीरिजमध्येही दिसणार आहे. ‘महारानी 4’ यंदाच सोनी लिव्हवर रिलीज होण्याची शक्यता आहे.