फक्त 7 हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करा सॅमसंगचा स्मार्टफोन, फोटोग्राफीसाठी मिळेल 50MP कॅमेरा

Samsung Galaxy A05 Offer: तुम्हाला जर कमी किंमतीत येणारा सॅमसंगचा समार्टफोन खरेदी करायचा असल्यास Samsung Galaxy A05 चा विचार करत शकता. अवघ्या 8 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या फोनमध्ये 50 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. Samsung Galaxy A05 च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Samsung Galaxy A05 ची किंमत
तुम्ही Samsung Galaxy A05 ला ई-कॉमर्स प्लेटफार्म फ्लिपकार्ट आणि Amazon वरून जवळपास 7,288 किंमतीत खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. याशिवाय, फोन खरेदी करताना Flipkart Axis Bank Credit Card चा वापर केल्यास 5 टक्के कॅशबॅक देखील मिळेल. या फोनला कंपनीने 9,999 रुपयात लाँच केले होते. म्हणजेच, फोनवर 2,711 रुपयांच्या डिस्काउंटचा फायदा मिळेल.
Samsung Galaxy A05 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A05 मध्ये 6.7 इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला असून, याचे पिक्सल रिझोल्यूशन 720×1600 आहे. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये कंपनीने मीडियाटेक हीलियो G85 चिपसेट मिळेल. सॅमसंगच्या या फोनमध्ये 25W सुपरफास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी 5000mAh ची बॅटरी दिली आहे,
कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G, WiFi, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5mm जॅक आणि यूएसबी टाईप-C पोर्ट यासारखे ऑप्शन्स दिले आहेत. तसेच, फेस अनलॉक फीचर देखील मिळते.
फोनमध्ये फोटोग्राफीसाठी रियरला 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा दिला आहे. तर, फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. व्हर्चुअल रॅमद्वारे स्टोरेज 6GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
Galaxy A05 सोबत कंपनी 4 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स आणि 2 ऑपरेटिंग अपग्रेड्स देखील देत आहे. या फोनलाब्लॅक, लाइट ग्रीन आणि सिल्वर रंगात खरेदी करू शकता. तुम्ही जर दैनंदिन वापरासाठी फोन शोधत असाल तर Samsung Galaxy A05 हा चांगला पर्याय आहे.




