बंपर डिस्काउंटसह खरेदी करा Samsung चा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, ऑफर-फीचर्स एकदा पाहाच

Samsung Galaxy F55 5G | भारतीय बाजारात 20 ते 25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सला सर्वाधिक मागणी आहे. तुम्ही देखील या किंमतीत येणारा नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. Samsung Galaxy F55 5G या शानदार फीचर्ससह येणाऱ्या फोनला खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता.
फोनच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येणाऱ्या या फोनला कंपनीने 31,999 रुपये किंमतीत लाँच केले होते. मात्र, आता फ्लिपकार्टवर हा फोन अवघ्या 19,190 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनच्या खरेदीवर बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा देखील तुम्हाला फायदा मिळेल. व्हेरिएंटनुसार फोनवर वेगवेगळ्या ऑफरचा फायदा मिळेल.
Samsung Galaxy F55 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung च्या फोनमध्ये 1080 x 2400 पिक्सल रिझोल्यूशनसह येणारा 6.7 इंच फुल एचडी+ सुपर एमोलेड प्लस डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्ट करतो.
फोनमध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. यामध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 7 जनरल 1 प्रोसेसर दिला आहे.
सॅमसंगच्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी तुम्हाला एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतील. यामध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. तर सेल्फीसाठी 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात 45 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी 5000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे.
फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP67 रेटिंगसह येतो. यात डॉल्बी अॅटमॉससह येणारे स्टीरिओ स्पीकर्स दिले आहेत.





