मस्तच! अवघ्या 30 हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय iPhone 15, बंपर डिस्काउंटसह खरेदीची संधी

iPhone 15 Offer: अनेकजण जास्त किंमतीमुळे अॅपलचा फोन खरेदी करणे टाळतात. तुम्ही देखील याच कारणामुळे आतापर्यंत आयफोन खरेदी केला नसल्यास काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही नवीन iPhone 15 ला 30 हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. या फोनवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे.
iPhone 15 चे 256 GB मॉडेल फ्लिपकार्टवर 12% म्हणजेच ₹9,901 च्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर फोन 79,900 रुपयांऐवजी 69,999 रुपये झाली आहे. यावर बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. जर तुम्ही Flipkart Axis बँक क्रेडिट कार्ड वापरून फोन खरेदी केला तर 5 टक्के अतिरिक्त सूट मिळले. HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरून ईएमआयवर फोन खरेदी केल्यास 1200 रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळतो. अशाप्रकारे, फोनची किंमत 68,799 रुपये होईल.
या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. आयफोन 15 वर तुम्हाला 62,200 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. मात्र, ही ऑफर तुमच्या एक्सचेंज फोनवर अवलंबून आहे. समजा, जुन्या फोनची किंमत एक्सचेंज ऑफरमध्ये 32 हजार रुपये असेल, तर अशाप्रकारे तुम्ही 30 हजारांच्या बजेटमध्ये नवीन आयफोन खरेदी करू शकता.
iPhone 15 मध्ये 6.1 इंच सुपर रेटिना डिस्प्ले दिला असून, यात Dolby Vision सपोर्ट मिळतो. यात A16 Bionic चिपसेट देण्यात आली असून, याद्वारे स्मूथ गेमिंग, मल्टीटास्किंग आणि UI चा अनुभव मिळेल. स्टोरेज आणि RAM च्या बाबतीत यामध्ये 6GB RAM आणि 256GB स्टोरेज दिले आहे.
फोनमध्ये रियरला 48MP + 12MP चा ड्युअल कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 12MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच, पॉवरसाठी 3349mAh बॅटरी मिळते.





