हृतिक रोशनचे दुसरे लग्न झाले? ‘त्या’ पोस्टनंतर नेटकऱ्यांनी केला सवाल

Hrithik Roshan and Saba Azad | अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद एकमेकांना डेट करत आहेत. सबा आझाद हृतिक रोशनपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. यावरून त्यांना अनेकदा ट्रोलही करण्यात आले होते. मात्र टीका करणाऱ्यांवर त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. यानंतर आता दोघांच्या रिलेशनशिपला तीन वर्षे झाली आहेत आणि या निमित्त दोघांनी खास पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टमुळे चाहते कंफ्यूज झाले आहेत.
हृतिक रोशनने सबासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. अभिनेत्याची पोस्ट पाहिल्यानंतर काही चाहते चकीत झाले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ‘हॅप्पी एनिव्हर्सरी पार्टनर 1.10.2024…’ असं लिहिले आहे. ज्यामुळे चर्चांना उधाण आलं. सध्या अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. Hrithik Roshan and Saba Azad |
View this post on Instagram
अभिनेत्याची पहिली पत्नी सुजैन खानने या पोस्टवर ‘सुपर फोटो,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. सबाने हाच फोटो तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आणि लिहिले, ‘हॅप्पी 3 इयर्स पार्टनर…’ असं कॅप्शन दिलं आहे. मात्र या पोस्टनंतर चाहते गोंधळले आहेत. या पोस्टवर कमेंट करत नेटकरी ‘लग्न कधी झालं?’, ‘या दोघांचं लग्न झालं आहे?’ असे सवाल करत आहे. Hrithik Roshan and Saba Azad |
परंतु हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे लग्न झालेले नाही, दोघे अजूनही रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांच्या डेटिंगला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, जे ते एकत्र साजरे करत आहेत. सबा अनेकदा रोशन कुटुंबातील सदस्यांसोबत घरातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसली आहे. दरम्यान, 2014 मध्ये सुझैन खान आणि हृतिकचा घटस्फोट झाला. त्यांना दोन मुलेही आहेत.





