Mirna Menon : हृतिक रोशन होता पहिला क्रश; ‘जेलर २’मध्ये एकत्र काम केल्यानंतर अभिनेत्री म्हणाली “तो खूपच…”
Mirna Menon : अभिनेत्रीने हृतिकसोबतचा सेटवरचा फोटोही शेअर केला आहे.

Mirna Menon : सुपरस्टार रजनीकांत यांच्या जेलर २ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून या चित्रपटातील कलाकारांना देखील मोठी लोकप्रियता मिळाली आहे. रजनीकांत यांच्या सूनेच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री मिर्ना मेनन एका सोशल मीडिया पोस्टद्वारे चर्चेत आली आहे.
पोस्टमध्ये बॅालिवूड अभिनेता हृतिक रोशनसोबत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर मिर्नाने तिचा आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्रीने हृतिकसोबतचा सेटवरचा फोटोही शेअर केला आहे.
‘बालपणीचा क्रश’सोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी
“बालपणीचा क्रश, असा अभिनेता ज्याचे मी नेहमीच कौतुक केले आहे आणि आता त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणे, ही भावना अविश्वसनीय आहे,” अशा शब्दांत मिर्नाने आपला आनंद व्यक्त केला. हृतिकसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना मिर्नाने त्याच्या व्यक्तिमत्त्वाचेही कौतुक केले. ‘जेलर २’मध्ये त्याच्यासोबत काम करणे हा खास अनुभव होता. त्याचबरोबर पडद्यामागील हृतिकला जाणून घेतल्यामुळे हा अनुभव आणखी संस्मरणीय ठरल्याचे तिने म्हटले.
View this post on Instagram
हृतिक अत्यंत उत्तम, प्रेमळ, नम्र आणि साधा स्वभावाचा असल्याचेही मिर्नाने सांगितले. त्याच्याबद्दलचा आपला आदर आणि प्रेम आणखी वाढल्याचे तिने नमूद केले. आयुष्यात काही क्षण एकदाच अनुभवायला मिळतात आणि हृतिकसोबतचा हा अनुभव त्यापैकीच एक असल्याचेही तिने म्हटले आहे. रजनीकांत यांच्या ‘जेलर २’मध्ये हृतिक कॅमिओमध्ये झळकला आहे. कथानकातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर त्याची एंन्ट्र्री होते.
‘जेलर २’मध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी
दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्या ‘जेलर २’मध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत मोहनलाल, शिव राजकुमार, विद्या बालन, मिथुन चक्रवर्ती आणि विजय सेतुपती यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, अनेक रेकॅार्ड चित्रपटाने मोडीत काढत तब्बल पाचशे कोटींचा विक्रमी टप्पा पार केला आहे.
Rukmini Vasanth : ‘कांतारा’ फेम अभिनेत्रीचा आगामी चित्रपट; ‘थारा’च्या भूमिकेत दिसणार, पाहा पहिली झलक





