हृतिक सबाची डिनर डेट चर्चेत

मुंबई-हृतिक रोशन सध्या चित्रपटांपासून दूर असला तरी सध्या तो अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत दिसू लागला आहे. यापूर्वी तो सामंथा लॉकवुडसोबत दिसला होता आणि आता तो सबा आझादचा हात धरून रेस्टॉरन्टमधून बाहेर येताना दिसला.
हृतिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात हृतिक रोशन हा अभिनेत्री सबा आझादसोबत हातात हात घालून फिरताना दिसत होता. त्यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशा चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा हृतिक आणि सबा दुसऱ्यांदा डेटवर जाताना दिसले. त्यांच्या या डेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते.हृतिक सबाची काळजी करताना दिसत होता. सध्या सबा आणि हृतिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
सबा आझाद ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. सबाने २००८ मध्ये ‘दिल कबड्डी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यात ती राहुल बोससोबत झळकली होती. त्यानंतर २०११ मध्ये तिने ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात काम केले.





