‘वॉर 2’मधील हृतिक आणि ज्युनियर NTRचा सेटवरील फोटो लीक; खास लुकची पहिली झलक समोर

War 2 Photos| अभिनेता हृतिक रोशन आणि ज्युनियर NTR ही जोडी लवकरच ‘वॉर 2’ चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. त्यादरम्यानचा हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या सेटवरील काही छायाचित्रे ऑनलाइन लीक झाली आहेत. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटातील दोघांची लुकची झलक पाहायला मिळाली आहे.
अभिनेता हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांनी काही आठवड्यांपूर्वीच ‘वॉर 2’ ची शूटिंग सुरू केली होती. व्हायरल फोटोमध्ये हृतिक रोशन स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे, तर ज्युनियर एनटीआर कॅज्युअल ब्लॅक आउटफिटमध्ये डॅशिंग दिसत आहे. हृतिक आणि ज्युनियर एनटीआरच्या फोटोंमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. War 2 Photos|
The boss is here. Stylish action Super star of India. Literally noone can replace him #HrithikRoshan#HareemShah#hareemshahleakedvideo #LovelyRunnerEp4
#haniaamir #War2#IshqMurshid #AIR1 pic.twitter.com/S0V4L587QB— Showbiz Update (@X_trend_) April 16, 2024
‘वॉर 2’ हा ब्लॉकबस्टर हिट ‘वॉर’चा बहुप्रतिक्षित सिक्वेल आहे. पहिल्या भागात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये ज्युनियर एनटीआरचीही एन्ट्री झाली आहे. चाहते हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआरला एकत्र पाहण्यासाठी नक्कीच खूप उत्सुक आहेत. दोन्ही स्टार्सनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.War 2 Photos|
‘वॉर’चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले होते, तर सिक्वेलचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. यात हृतिक आणि ज्युनियर एनटीआरसह कियारा अडवाणी देखील असणार आहे. ‘वॉर’ हा एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट होता, ज्याने रिलीजच्या एका आठवड्यात 200 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट 2019 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक होता. ‘वॉर 2’ 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा :
सोन्या – चांदीच्या किंमत विक्रमी वाढ; १० ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये





