स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा?

कांचन नायकवडी

उपचार करण्यापेक्षा नेहेमी अटकाव करणे केव्हाही श्रेयस्कर- एनसीडी प्रकारात मोडणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाविषयी हे अक्षरशः खरे आहे. या घातक आजाराला जीवनशैलीतील सुदृढ बदल आणि नियमित आरोग्य तपासणीतून प्रतिबंध घालता येतो. स्तनांच्या कर्करोगाविषयी जागरूक असणे, या रोगाचे प्रारंभिक अवस्थेतच निदान होण्यासाठी पावले उचलणे, आणि इतरांनाही तसे करण्यासाठी प्रोत्साहन देणे, यांमुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून उत्तम प्रकारे अटकाव करतायेतो. ( breast cancer symptoms )

बैठया कामावर आधारित जीवनशैली, अनुचित आहार आणि जागरूकतेचा अभाव या कारणांमुळे स्तनाच्या कर्करोगात वर्षागणिक वाढ होत आहे. लवकर किंवा प्रारंभिक अवस्थेत निदान झाल्यास स्तनाचा कर्करोग टाळता येऊ शकतो. इंडसमध्ये आम्ही सतत निरनिराळया जागरूकता मोहिमा, शिबिरे घेत असतो आणि प्रत्येक घरात प्रतिबंध आणि निरोगी जीवनाची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करीत असतो.

स्तनाविषयी जागरूक रहा
तुमचे स्तन चाचपून पहा.
तुम्हाला स्पर्शाला काही वेगळे जाणवते का?
काही बदल आहेत का बघा
आकार किंवा रचना यात काही फरक जाणवतोय का ?
काही वेगळे जाणवले का?
काहीतरी बरोबर नसल्याचा संशय येतोय? तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.
निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा
धूम्रपान सोडा आणि मद्य सेवनावर मर्यादा आणा
बीएमआय आटोक्‍यात ठेवा

रोज व्यायाम करा ( breast cancer symptoms )
पोषक आहार घ्या आणि जंक फूडचा वापर टाळा
नियमित आरोग्य तपासणी करून घ्या
आपल्या कुटुंबाचा आरोग्य इतिहास माहीत करून घ्या किंवा स्तनाचा कर्करोग आणि इतर आजारांकडे असलेला आपल्या शरीराचा कल जाणून घेण्यासाठी डीएनए तपासणी करून घ्या.
जितके दिवस शक्‍य होईल तितके दिवस आपल्या तान्ह्या बाळाला स्तनपान करू द्या.
वेळीच घेतलेली काळजी तुम्हाला जन्मभरासाठी पुरेल
एका मोठया आरशासमोर उभे राहून खाली दिलेली कृती करा

सुरुवात करताना आपले खांदे ताठ ठेवून आणि हात सरळ बाजूला ठेवून तुमच्या स्तनांकडे बघा. नेहेमीचे माप, आकार, रंग किंवा दिसणारा बदल किंवा सूज कळण्यासाठी निरीक्षण करा.
तुमचे हात उंचावा आणि वर दिलेल्या गोष्टी तपासून बघा.
स्तनाग्रातून काही स्त्राव बाहेर येतोय का ते पहा.

खाली झोपा आणि आपल्या स्तनांना स्पर्श करा. उजव्या हाताचा उपयोग डावा स्तन तपासण्यासाठी तसेच डाव्या हाताचा उपयोग उजवा स्तन तपासण्यासाठी करा.
गोलाकार हात फिरवत, बोटे सरळ ठेवत हळुवारपणे आणि दाबून आपल्या स्तनांची पाहणी करा. आता हीच कृती उभे राहून करा.( breast cancer symptoms )

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.