निवडणुकीत उमेदवाराला किती डिपॉझिट भरावे लागते? ते कधी जप्त होते?

Security Deposit| आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. देशभरात एकुण सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार उमेदवारांची नाव देखील जाहीर केली जात आहे. येत्या 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज 27 मार्च रोजी शेवटची तारीख आहे.
परंतु निवडणूकांच्या काळात नेहमीच एक वाक्य ऐकायला मिळते. ते म्हणजे ‘या उमेदवारचं डिपॉझिट जप्त झालं’. डिपॉझिट जप्त होणे यालाच अनामत रक्कम असेही म्हणतात. याबाबत आज आपण काही माहिती जाणून घेऊयात.
डिपॉझिट जप्त होणे म्हणजे काय? Security Deposit|
एखादी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला एक निर्धारित रक्कम निवडणूक आयोगात जमा करावी लागते. या रकमेला डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम म्हटले जाते. जर एखाद्या उमेदवाराला निश्चित मतं मिळवता आली नाही तर त्याची अनामत रक्कम जप्त होते. ही अनामत रक्कम प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळी असते. ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत, प्रत्येक निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला अनामत रक्कम द्यावी लागते.
कोणत्या निवडणुकीत किती अनमात रक्कम? Security Deposit|
लोकसभा निवडणूकीसाठी सर्वसमान्य वर्गातील उमेदवारांना 25 हजार रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागते. तर एससी आणि एसटी वर्गाच्या उमेदवारांसाठी ही रक्कम 12,500 असते. तर विधानसभा निवडणूकीसाठी सर्वसामान्य गटातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम 10 हजार रुपये असते. तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना 5 हजार रुपये जमा करावे लागतात.
अनामत रक्कम जप्त का होते? Security Deposit|
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा उमेदवार जागेवर एकूण मतदानाच्या 16.66% मते मिळवू शकले नाही, तर त्या उमेदवारची अनामत रक्कम जप्त केली जाते. समजा एका जागेवर 1 लाख मते पडली आणि 5 उमेदवारांना 16,666 पेक्षा कमी मते मिळाली, तर त्यांचे सर्व डिपॉझिट जप्त होते.
कधी मिळते अनामत रक्कम परत ?
उमेदवाराला 1/6 पेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याची अनामत रक्कम परत केली जाते. विजयी उमेदवाराला 1/6 पेक्षा कमी मते मिळाली तरीही त्याचे पैसे परत केले जातात. उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यास किंवा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास, अनामत रक्कम परत केली जाते. मतदान सुरु होण्यापूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाल्यास, अनामत रक्कम त्याच्या कुटुंबीयांना परत केले जातात.
किती जणांची अनामत रक्कम जप्त झाली?
1951- 52 च्या पहिल्या निवडणुकीत 1 हजार 874 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यातील 745 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली होती. तर 2009 मध्ये एकुण 1623 उमेदवारांपैकी 779 उमेदवारांनी अनामत रक्कम जप्त झाली होती. लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत 71 हजार उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले आहे.
हेही वाचा
रणदीप हुड्डाला सलाम! ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे रवी जाधवांकडून कौतुक




